मानव वेदना मुक्ती केंद्र
निसर्गोपचार व पर्यायी चिकित्सालय
'ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान' या सामाजिक संस्थेचा हा विशेष उप्रक्रम आहे. लातूर पासून १२ कि.मी. अंतरावर स्तिथ बुधोडा गावात निसर्गरम्य २.५ एकर कॅम्पस मध्ये 'मानव वेदना मुक्ती केंद्र' आहे. हे एक नाविन्यपूर्ण निसर्गोपचार व पर्यायी चिकित्सालय आहे.
OUR BACKGROUND
How We Got Here
निसर्गोपचार पद्धतीने सर्व प्रकारच्या व्याधी,आजारांवर आपण विजय मिळवू शकतो. शेकडो रुग्णांनी याचा अनुभव घेतलाय व व्याधीमुक्त झाले आहेत. ही किमया केली आहे निसर्पोचार तज्ञ् श्री. हरिश्चंद्र सुडे यांनी.
रुग्णांच्या प्रकृती प्रमाणे सूक्ष्म व्यायाम, ऍक्युप्रेशर -मसाज व रसाहार द्वारे निसर्गोपचार करण्याची स्वतःच्या शैलीत नाविन्यपूर्ण चिकित्सा पद्धत त्यांनी विकसित केली आहे.
श्री. हरिश्चंद्र सुडे हे जेष्ठ गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची उभारणी १९८१ साली केली. ग्रामीण अंध युवकांसाठी ऍक्युप्रेशर -मसाज चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारले. स्वाधार -अंध अपंग पुनर्वसन केंद्र या नाविन्यपूर्ण पुनर्वसन प्रकल्पाची संकल्पना यशस्वी करून दिव्यांगांच्या पुनर्वसनाचा लातूर पॅटर्न निर्माण केला.
आधुनिक जीवनशैलीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या गंभीर होत असलेल्या आरोग्याच्या प्रश्नावर एकच पर्याय म्हणजे निर्गोपचार. व्याधींनी त्रस्त रुग्नांना उत्तम उपचार मिळावेत व स्वाधार केंद्रातील अंध चिकित्सकांना रुग्णसेवेची संधी मिळावी, यासाठी १६ मार्च २०१८ ला प्रिसिजन कॅमशाफ्टस लि . सोलापूर यांच्या आर्थिक सहयोगातून मानव वेदना मुक्ती केंद्र या निसर्गोपचार व पर्यायी चिकित्सालयाची स्थापना करण्यात आली.
30 min
100 Indian rupees1 hr
500 Indian rupees8 hr
1,000 Indian rupees
